मध्य रेल्वेवरील नाहूर – मुलुंडदरम्यान दोन गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेवरील सहा मार्गावर विशेष रात्रीचा वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गावर शनिवारी मध्यरात्री १.२० वाजेपासून ते रविवारी पहाटे ४.२० वाजेपर्यंत आणि शनिवारी रात्री १.२० ते रविवारी पहाटे ५.१५ पर्यंत विक्रोळी – मुलुंड दरम्यान अप – डाऊन जलद आणि धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत मेल – एक्सप्रेस आणि लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
हेही वाचा >>>मुंबई : फेसबुकवर ओळख झालेल्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चित्रीकरण करून मुलीला पाठवले
ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा रद्द राहतील. ब्लॉकपूर्वी सीएसएमटीकडे जाणारी शेवटची लोकल कल्याणहून रात्री ११.५२ वाजता सुटेल. तर, ब्लॉकनंतर कल्याणकडे जाणारी पहिली कर्जत लोकल सीएसएमटीवरून पहाटे ४.४७ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल कल्याणहून संध्याकाळी ४. ४८ वाजता सुटेल. ब्लॉकमुळे कोणार्क एक्स्प्रेस ठाणे स्थानकापर्यंत, हावडा – सीएसएमटी मेल दादर स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे. तर, शालीमार एक्सप्रेस, विशाखापट्टणम-एलटीटी एक्सप्रेस, मंगलोर-सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस, गोरखपूर-एलटीटी एक्सप्रेस आणि हैदराबाद-सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस एक तासाने उशिराने धावणार आहे.
हेही वाचा >>>मुंबई : फेसबुकवर ओळख झालेल्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चित्रीकरण करून मुलीला पाठवले
२४/२५ फेब्रुवारी आणि ३/४ मार्च २०२३ रोजी वांगणी आणि नेरळ स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावर अभियांत्रिकी कामासाठी मध्यरात्री १.५० वाजेपासून पहाटे ४.५० वाजेपर्यंत (३ तास) विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून रात्री १२.२४ वाजता सुटणारी कर्जत लोकल बदलापूरपर्यंत धावेल. कर्जत येथून रात्री २.३३ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल बदलापूरहून सुटेल.
हेही वाचा >>>गोठे, तबेल्यांमधील मलमूत्राचा खत म्हणून उद्यानांसाठी वापर करावा, नदी प्रदुषण रोखण्यासाठी भाजपची मागणी
२७ फेब्रुवारीपासून ‘या’ लोकल रद्द
रात्रकालीन ब्लॉकमुळे मुख्य मार्गावरील काही उपनगरीय सेवांचे रद्द, तर काही सेवा अंशत: चालविण्यात येणार आहेत. २७ फेब्रुवारीपासून पुढील सूचनेपर्यंत सीएसएमटी आणि ठाणे दरम्यानच्या रात्रीच्या ब्लॉकमुळे डाऊन मार्गावरील सीएसएमटीवरून रात्री १२.२० वाजता सुटणारी कुर्ला लोकल, रात्री १२.२८ ची ठाणे लोकल, रात्री १२.३१ ची कुर्ला लोकल आणि दादर येथून रात्री १२.२९ वाजता सुटणारी ठाणे लोकल रद्द करण्यात येणार आहे.
ब्लॉकमुळे आसनगाव येथून रात्री १०.१० वाजता सीएसएमटी लोकल ठाण्यापर्यंत चालविण्यात येईल. अंबरनाथ येथून रात्री १०.१५ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल कुर्ल्यापर्यंत चालविण्यात येईल. कल्याण येथून रात्री १०.५६ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल कुर्ल्यापर्यंत चालविण्यात येईल.