मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे या स्थानकांदरम्यान २७ फेब्रुवारीपासून रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. यामुळे मुख्य मार्गावरील काही डाउन उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर अप उपनगरीय मार्गांवरील काही रेल्वे फेऱ्या अंशतः चालविण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>>पुनर्विकासातील घर आता महाग?; १ एप्रिलपासून अतिरिक्त क्षेत्रफळ, आकस्मिकता निधीवर भांडवली नफा कर
२७ फेब्रुवारी रोजी डाउन उपनगरीय मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटणारी कुर्ला लोकल, रात्री १२ वाजून २८ मिनिटांनी सुटणारी ठाणे लोकल, रात्री १२ वाजून ३१ मिनिटांनी सुटणारी कुर्ला लोकल आणि दादर येथून १२ वाजून २९ मिनिटांनी सुटणारी ठाणे लोकल रद्द करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>मुंबई : पश्चिम बंगालमधील संवेदनशील परिसरातून सायबर भामट्याला अटक, माटुंगा पोलिसांची कारवाई
अप उपनगरीय मार्गावरील आसनगाव येथून रात्री १० वाजून १० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरिता सुटणारी लोकल ठाण्यापर्यंत चालविण्यात येणार आहे. तसेच अंबरनाथ येथून १० वाजून १५ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी लोकल, तसेच कल्याण येथून १० वाजून ५६ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरिता सुटणारी लोकल कुर्ल्यापर्यंत चालविण्यात येणार आहे. कल्याण येथून रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी दादरकरिता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.