रात्रशाळांमधील शिक्षकांना निवृत्तीवेतन (पेन्शन) आणि भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) मिळत नसल्याच्या विरोधात आमदार रामनाथ मोते दोन डिसेंबरपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत.
रात्रशाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना अर्धवेळ कर्मचारी गणले जात असून, त्यांना अध्रे वेतन दिले जाते. तर घरभाडे भत्ता अजिबात दिला जात नाही. त्यांचा भविष्य निर्वाह निधी कापला जात नाही, पेन्शन योजनाही लागू नाही. त्यामुळे निवृत्तीनंतर अशा शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे मोते यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी मंत्री होण्यापूर्वी आमदार या नात्याने रात्रशाळांच्या प्रश्नांबाबत विधानसभेत शासनाबरोबर संघर्ष केला होता. मात्र आता मंत्री झाल्यानंतर रात्रशाळांचा त्यांना विसर पडला आहे, असा आरोप शिक्षक परिषदेचे संघटनमंत्री अनिल बोरनारे यांनी केला.
पेन्शन, पीएफपासून रात्रशाळा शिक्षक वंचित
रात्रशाळांमधील शिक्षकांना निवृत्तीवेतन (पेन्शन) आणि भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) मिळत नसल्याच्या विरोधात आमदार रामनाथ मोते दोन डिसेंबरपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-11-2013 at 02:41 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Night teacher will not get pension and pf