अमली पदार्थाची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका झांबियन युवतीला अटक होण्याची घटना नुकतीच घडली असताना शहरात कोकेन बाळगून त्याची विक्री करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला शुक्रवारी अटक करण्यात आली.
 च्यू क्यू यू गॅब्रियल इमेका असे या व्यक्तीचे नाव असून तो दिवा येथे राहत होता. शुक्रवारी संध्याकाळी मालाड येथील इनऑर्बिट मॉलच्या मागे असलेल्या बागेजवळ तो १० ग्रॅम कोकेन पावडरची विक्री करताना आढळला. बाजारात या कोकनची किंमत ५० हजार एवढी आहे.
पायधुनी येथे खुनाचा प्रयत्न
पायधुनी येथील मांडवी पोस्ट ऑफिस परिसरात दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर एकाने दुसऱ्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी घडली.
या प्रकरणी मोहमद आदिक नुरमोहमद शेख याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मोहम्मद शेख आणि इब्राहीम हसन बाजहेर या दोघांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली.

Story img Loader