लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्यानंतर बेपत्ता असलेल्या ७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह शनिवारी शोधमोहिमेत सापडला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणामुळे १५ जणांच्या मृत्यूला कारभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Two tigress cubs die in Pench Tiger Reserve
वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू, एकाचा जीवनमरणाचा संघर्ष…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Crime against city president of Shinde group fraud of Rs 1 crore 56 lakh by lure of job
शिंदे गटाच्या शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा, नोकरीचे आमिष दाखवून…
murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
buldhana couple murder loksatta news
बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…
Jaideep Apte , bail , High Court,
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण, जयदीप आपटे याला उच्च न्यायालयाकडून जामीन
Eight minor girls escape from Ulhasnagar government observation home
उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षणगृहातील आठ अल्पवयीन मुली पळाल्या
man cheated Seven unemployed people by luring them with Navy jobs
नौदलात नोकरीचे आमिष दाखवून, सात बेरोजगारांना गंडा

‘नीलकमल’ ही प्रवासी बोट पर्यटक आणि प्रवाशांना घेऊन घारापुरीकडे जात होती. दुपारी ३.५५ वाजता नौदलाच्या एका ‘स्पीड बोटी’ने प्रवासी बोटीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यामुळे ‘नीलकमल’ बोटीला भगदाड पडले. त्यातून पाणी आत शिरल्यामुळे बोट बुडू लागली. अपघाताची माहिती मिळताच नौदल, तटरक्षक दल व मुंबई सागरी पोलिसांच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

आणखी वाचा-अभ्युदयनगर पुनर्विकासाच्या निविदेला ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

नौदलाच्या ११ नौका, तटरक्षक दलाची एक व यलोगेट पोलीस ठाण्याच्या ३ नौका तसेच स्थानिक मच्छीमार नौकांच्या सहाय्याने मदतकार्य सुरू करण्यात आले. नौदलाच्या चार हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली. दोन्ही बोटींवर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह असे एकूण ११५ जणांना बचाव कार्यारत बाचवण्यात आले. यापैकी १५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील आठ मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. त्यानंतर हंसाराम भाटी यांचा मृतदेह बोटीच्या सांगाड्यात सापडला होता पण अपघाताला ४८ तासांहून अधिक कालवधी झाला असताना नीलकमल बोटीवरील सात वर्षांचा मुलगा जोहान निसार अहमद हा बेपत्ता होता. शनिवारी त्याचाही मृतदेह सापडला आहे. त्याच्या शोधासाठी तटरक्षक दलाच्या बोटी व हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते.

आणखी वाचा-आरोग्य केंद्रातील सहाय्यक परिचारिका प्रसविकांना दिलासा

या अपघात वाचलेले नाथाराम चौधरी (वय २२ वर्षे, राहणार साकीनाका, मुंबई) यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१)), १२५ (अ) (ब), २८२, ३२४ (३)(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असून तक्रारदारासह ११ हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. अपघातग्रास्त नीलकमल बोटीची तज्ज्ञांमार्फत तपासणीही केली जाणार आहे. त्यात मेरीटाईम बोर्डाचीही मदत घेण्यात येणार आहे. याशिवाय नौदलाकडूनही याप्रकरणी तपासणी करण्यात येणार आहे. पोलीसही याप्रकरणी नौदलाच्या संपर्कात असून त्यांच्याकडून मदत घेतली जात आहे.

Story img Loader