मध्य रेल्वेला सोमवारी ट्रान्स हार्बरवर मार्गावरील काही फेऱ्या नऊ डब्यांच्या गाडीसह चालवण्याची नामुष्की सहन करावी लागली.
या मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने या मार्गावर फक्त १२ डब्यांच्या गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सोमवारी १२ डब्यांच्या एका गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेने या मार्गावर नऊ डब्यांची गाडी चालविली. इतर दिवसांपेक्षा तीन डबे कमी असल्याने प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाले. सोमवारी तांत्रिक बिघाडामुळे एक गाडी कारखान्यातच उभी राहिली. या गाडीमार्फत चालणाऱ्या ३० सेवा रद्द होऊ नयेत, यासाठी मध्य रेल्वेने या १२ डब्यांच्या गाडीऐवजी नऊ डब्यांची गाडी चालवली. मात्र सकाळपासून ही नऊ डब्यांची गाडी चालत असल्याने प्रवाशांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा