मुंबई: आरोग्य सेवा नागरिकांच्या आवाक्यात यावी, तसेच त्यांच्यावर स्वस्तात उपचार व्हावेत यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणून नावारुपाला आली असून या योजनेंतर्गत मागील चार वर्षांमध्ये तब्बल चार कोटी ९८ लाख २ हजार ९५९ नागरिकांनी लाभ घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील फक्त ९ लाख ४९ हजार ३२९ नागरिकांनीच लाभ घेतला असून, या योजनेचा लाभ घेण्यामध्ये महाराष्ट्र देशात १२ व्या स्थानकावर आहे.

देशातील मध्यम व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील १२ कोटी नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी सप्टेंबर २०१८ मध्ये ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत मधुमेह, कर्करोग, हृदय रोग यासह विविध आजारांवर उपचार करण्यात येतात. प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाखांपर्यंतच आरोग्य सुरक्षा पुरविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मागील चार वर्षांमध्ये लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. २०२०-२१ मध्ये देशामध्ये ७० लाख ६ हजार नागरिकांनी लाभ घेतला होता. तर २०२३-२४ मध्ये लाभार्थ्यांची संख्या १ कोटी १९ लाखावर पोहोचली.

home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
home voting in nala sopara
वसई: नालासोपाऱ्यात १२१ नागरिकांचे गृहमतदान
thane district senior citizen home voting
ठाणे जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात
akola vidhan sabha election 2024
प्रचारातून विकासाचे मुद्दे हद्दपार, जातीय राजकारण, बंडखोरी व मतविभाजनाचे गणितच चर्चेत; सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बगल
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
Movements need to connect with mainstream politics says Jalinder Patil
चळवळींनी प्रवाहातील राजकारणाशी जोडून घेणे आवश्यक – जालिंदर पाटील
Kashmir youth employment, Pune organisation,
काश्मीर खोऱ्यातील तरुणही आता रोजगाराभिमुख, पुण्यातील संस्थांचा लष्काराच्या मदतीने पुढाकार

हेही वाचा… वातावरण बदल, प्रदूषणामुळे साथीच्या आजारांचा विळखा; मुंबईसह परिसरात डेंग्यू, हिवताप, गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ

देशातील लाभार्थ्यांच्या संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या अन्य राज्यांच्या तुलनेत फारच धीम्या गतीने वाढत आहे. तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या फारच कमी आहे. महाराष्ट्रामध्ये मागील चार वर्षांमध्ये ९ लाख ४९ हजार ३२९ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत लाभार्थ्यांची संख्या फक्त १ लाख ३३ हजार ९२६ इतकी झाली आहे. २०२३-२४ मध्ये आसाम, छत्तीसगड, तेलंगणा व जम्मू आणि काश्मीर या राज्यांमधील लाभार्थ्यांची संख्या अडीच लाख ते ९ लाखांपर्यंत होती. त्याच वेळी महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या १ लाख ३३ हजार इतकी आहे. महाराष्ट्रातील २०८ सरकारी रुग्णालयांसह ८३६ खासगी रुग्णालयांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र असे असताना आजही अनेक नागरिक या योजनेपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे.

चार वर्षातील महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या

वर्षलाभार्थी
२०२०-२१२,३०,२०५
२०२१-२२२,९१,६६९
२०२२-२३२,९३,५२९
२०२३-२४१,३३,९२६

राज्यनिहाय लाभार्थ्यांची संख्या

राज्यलाभार्थी
तामिळनाडू८३,८९,६९०
राजस्थान७७,००,५९८
कर्नाटक५५,७१,१८३
केरळ४४,४३,८३३
छत्तीसगड३५,८४,९३०
मध्य प्रदेश२९,६३,३९५
गुजरात२३,७५,३२९
उत्तर प्रदेश२३,७१,३९२
आंध्र प्रदेश२१,४४,५९०
पंजाब१५,६७,९११
झारखंड१२,५१,८७०
उत्तराखंड९,७९,९२८
महाराष्ट्र९,४९,३२९