सरकारचा भ्रष्टाचार, अनेक गंभीर चूका, आत्तापर्यंत झालेले घोटाळयांचे आरोप, दुष्काळ हाताळण्यात आलेले अपयश, नागरी वस्त्यांमधील नियोजनाचा अभाव, घनकचऱ्याचा प्रश्न आणि चार वर्षात पेट्रोल-डिझेलची दरवाढ करुन जनतेची केलेली लूट असे अनेक प्रश्न घेवून राष्ट्रवादी काँग्रेस ‘निर्धार परिवर्तनाचा’ या यात्रेचे आयोजन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या यात्रेमधील पहिली सभा महाडच्या चवदार तळ्यावर घेतली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पाटील म्हणाले, १० जानेवारीपासून सुरु होणारी ही परिवर्तन यात्रा जवळपास ८ ते १० फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेवून या परिवर्तन यात्रेची सुरुवात केली जाणार आहे. तर पहिली सभा सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाडच्या ऐतिहासिक चवदार तळयाच्याठिकाणी घेतली जाणार आहे. या परिवर्तन यात्रेमध्ये अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे यांसह इतर नेते सहभागी होणार आहेत.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
no final decision on how many ministerial posts will be distributed to BJP Shiv Sena and NCP print politics news
मंत्र्यांच्या संख्येवरून महायुतीत चर्चा सुरूच

ही निर्धार परिवर्तन यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्हयातील प्रत्येक गावामध्ये जाणार असून राज्यातील जनतेला सरकारच्या मनमानी कारभाराची जाणीव करुन देवून जनतेचे सहकार्य घेण्यात येणार आहे. दरम्यान, पाटील यांनी यावेळी केंद्र आणि राज्यसरकारच्या कारभारावर जोरदार टिका केली. राज्यात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री जिथे जातात तिथे आंदोलनकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यासाठी त्यांनी दिवंगत शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलगा, सांगलीमध्ये धनगर समाजाचे नेते विष्णू माने यांना, धुळयामध्ये शेतकरी मोर्चा काढणाऱ्या प्रतिभा शिंदे या महिला शेतकऱ्यालाही स्थानबद्ध करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, सरकारने घाईगडबडीने २ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. परंतु सरकार हे अनुदान कुणासाठी देते आहे हाच प्रश्न लोकांना पडला आहे. आधारभूत किंमतीपर्यंत पीक पोचत नसेल तर सरकारने बाजारात उतरुन कांदा चढयादराने खरेदी केला पाहिजे त्याशिवाय कांद्याचा भाव स्थिर होणार नाही. गारपीट आणि अवकाळी पाऊस पडला त्यामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी सरकारने जीआरमध्ये जाहीर केली त्यावरही त्यांनी आक्षेप घेतला. तसेच कर्जमाफीबाबतही सरकारची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे अक्षरश: बोजवारा उडालेला आहे. कर्जमाफीबाबात शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा उरलेल्या नाहीत. ९० टक्के कर्जमाफी दिल्याचे भाजपचे अध्यक्ष दानवे विधान करत आहेत. परंतु सरकारने फक्त १५ ते १६ हजार कोटी रुपयेच कर्जमाफीची रक्कम वाटल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.

Story img Loader