झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या मुख्य अधिकारीपदी राज्य शासनाने शुक्रवारी ज्येष्ठ सनदी अधिकारी निर्मलकुमार देशमुख यांची नियुक्ती केली. प्राधिकरणाचे विद्यमान मुख्य अधिकारी संभाजी झेंडे यांची बदली करण्यात आली असून त्यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. झेंडे फेब्रुवारी २००९ पासून या पदावर होते.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी पदावरून बदली झाल्यानंतर देशमुख गेले पाच महिने नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. अखेरीस शुक्रवारी राज्य शासनाने त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. देशमुख यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी, म्हाडाच्या इमारत व दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य अधिकारी तसेच मुंबईचे उपनगर जिल्हाधिकारी अशी जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

Story img Loader