मुंबई : महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून भाजप विधिमंडळ पक्षाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत निवडीची औपचारिकता पार पाडली जाईल. बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याने आदल्या दिवसापर्यंत नावाची अधिकृत घोषणा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले. जात असले तरी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची औपचारिक निवड झाल्यानंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेसाठी महायुतीतर्फे दावा केला जाईल. तत्पूर्वी भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी बुधवारी सकाळी १० वाजता विधान भवनात बैठक होणार आहे. केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत फडणवीस यांची निवड होणे अपेक्षित आहे. या बैठकीनंतर भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीच्या आमदारांची संयुक्त बैठक पार पडेल. त्यानंतर महायुतीकडून सत्तास्थापनेसाठी दावा केला जाईल. राज्यपालांकडून मंत्रिमंडळ शपथविधी समारंभ गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आयोजित केला असल्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर, धर्मगुरू, संत-महंत यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे.
शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, हा भाजपचा आग्रह असून त्यांना हवे असलेले गृह खाते देण्याची मात्र भाजपची तयारी नाही. मात्र अजित पवार यांना हवे असलेले अर्थ खाते, कृषी व काही महत्त्वाची खाती भाजपकडून दिली जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी नमूद केले. फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन यांनी ठाण्यात जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
‘शिंदे हे शरद पवार किंवा बाळासाहेब नव्हेत’
भाजपकडे १३२ जागांसह प्रचंड संख्याबळ आहे. त्यामुळे भाजप गृहमंत्रीपदाची शिंदेंची मागणी मान्य करणार नाही. शिंदेंनी सरकारबाहेर राहणेही फारसे उचित ठरणार नाही. आत्ताचे राजकारण बदलत असून सरकारबाहेर राहून नुकसान होईल, असा दावा महायुतीतील घटक पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला. शिवाय शिंदे म्हणजे शरद पवार किंवा बाळासाहेब ठाकरे नव्हेत, अशी टिप्पणीही या नेत्याने केली. शिंदेंनी गृह मंत्रालयाची मागणी करणे गैर नव्हे. आता ते काय निर्णय घेतात हे पाहायचे, असे शिंदे गटातील खासदार संदिपान भुमरे यांनी सांगितले.
खातेवाटपावर आज चर्चा?
शिंदे यांची नाराजी अद्याप दूर झाली नसल्याचे संकेत आहेत. रविवारी साताऱ्याहून ठाण्यात आलेले काळजीवाहू मुख्यमंत्री अद्याप ‘वर्षा’ निवासस्थानी गेलेले नाहीत. ते आजारी असून ठाण्यातील घरी विश्रांती घेत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सोमवारीही खातेवाटपाची चर्चा होऊ शकली नाही. आता आज, मंगळवारी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार एकत्र बसून चर्चा करतील, असे सांगितले जात आहे. अजित पवार हे सोमवारी खासगी कार्यक्रमासाठी नवी दिल्लीला गेले असून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
आझाद मैदानात शपथविधीची तयारी
बहुमत असलेल्या पक्षाकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आल्यावर शपथविधी समारंभ आयोजित करण्याचे निर्देश राज्यपालांकडून मुख्य सचिव किंवा राजशिष्टाचार विभागाला दिले जातात. मात्र महायुतीकडे मोठे बहुमत असल्याने ही प्रक्रिया होण्याआधीच सोहळ्याची तयारी अनौपचारिकपणे सुरू करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आधीच याची घोषणा करून टीका ओढवून घेतली होती. सोमवारी भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली. मात्र शिवसेनेचे कोणीही नेते मैदानाकडे फिरकलेले नाहीत.