रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अनंत अंबानीही होता. या दोघांनीही आकाश या त्यांच्या मुलाची लग्न पत्रिका गणपतीच्या चरणी अर्पण केली.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. श्लोका मेहता या हिरे व्यापारी रसेल मेहतांच्या मुलीशी आकाश अंबानीचे लग्न होणार आहे. 9 मार्चला हे दोघे लग्न करणार आहेत. मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये तीन दिवस हा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. 11 मार्चला मोठे रिसेप्शनही होणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. याच लग्नाची पहिली पत्रिका मुकेश आणि नीता अंबानी यांनी सिद्धिविनायकाच्या चरणी ठेवली आणि कार्य निर्विघ्न पार पडावे अशी प्रार्थना केली.