भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. नितेश राणेंनी संजय राऊत महाविकासआघाडीचे गौतमी राऊत असल्याचं म्हणत टीका केली. तसेच राऊतांना ते नेमके कुणाच्या बाजूने आहेत हेही माहिती नाही. त्यामुळे त सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदलतात, असा हल्लाबोल केला. ते शनिवारी (२७ मे) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
नितेश राणे म्हणाले, “संजय राऊत नेमके कुणाच्या बाजूने आहेत हे त्यांनाही माहिती नाही. त्यामुळे सरड्यालाही लाज वाटेल एवढ्यावेळा ते रंग बदलत आहेत. महाविकासआघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राजाराम राऊत आहेत.”
“गौतमी पाटील वेगवेगळ्या कार्यक्रमात जाऊन लोकांचं मनोरंजन करते”
“गौतमी पाटील वेगवेगळ्या कार्यक्रमात जाऊन लोकांचं मनोरंजन करते, नाचते, लोकांना नाचवते. ती उत्तम कलाकार आहे आणि लोकप्रियही असेल. तिला पाहायला लोकांना आवडतं. तसंच या महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलला वाटतं की, लोकांना त्याला पाहायला आवडतं. तो गैरसमज दूर झाला पाहिजे,” अशी टीका नितेश राणे यांनी केली.
हेही वाचा : राजकारणात येणार का? गौतमी पाटीलची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाली…
“मी गौतमी पाटीलला विनंती करेल की, तिने…”
“मी गौतमी पाटीलला विनंती करेल की, तिने तिचं मेकअपचं काही सामान असेल तर ते संजय राऊतांकडे पाठवावं. गौतमीने राऊतांचं थोबाड थोडं चांगलं करावं. रोज सकाळी येऊन नशेत असल्यासारखं बोलत असतात. लोकांची सकाळ खराब करतात. ते इतरांची सुपारी घेऊन आग लावण्याचं,काड्या करण्याचं काम करतात,” असा आरोप नितेश राणेंनी राऊतांवर केला.