‘स्वाभिमान’ संघटनेचा माजी कार्यकर्ता चिंटू शेख याच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने नोंदविलेला खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्याचे उद्योग मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि संघटनेचे अध्यक्ष नितेश यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर दोन आठवडय़ांत उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले.
शेख आणि आपल्यामध्ये न्यायालयाबाहेर तडजोड झाली असून शेख आपल्याविरुद्धचा गुन्हा मागे घेण्यासाठी तयार आहे. या पाश्र्वभूमीवर सीबीआयने या प्रकरणी दाखल केलेला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी नितेश यांनी याचिकेद्वारे केली आहे. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर नितेश यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी नितेश यांच्या वतीने अ‍ॅड्. महेश जेठमलानी यांनी शेख गुन्हा मागे घेण्यास तयार असल्याचे न्यायालयाला सांगितले. अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्येही दोन्ही पक्षांमध्ये तडजोड शक्य असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिल्याचे जेठमलानी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच या प्रकरणी निव्वळ राजकीय वादातून नितेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा करीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर त्यांच्याविरुद्ध सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी जेठमलानी यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा