मुंबई : मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन तीन आठवडे तर खातेवाटपाला दोन आठवडे झाले तरीही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांचा घोळ अद्यापही संपलेला नाही. काही जिल्ह्यांवरून तिन्ही पक्षांनी ताणून धरल्याने त्यातून मार्ग काढताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कदाचित जिल्ह्याबाहेरच्या मंत्र्यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्याची जुनी प्रथा पुन्हा पाडली जाऊ शकते, असेही बोलले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महायुतीत कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पक्षाचा पालकमंत्री यावरून अद्यापही सहमती होऊ शकलेली नाही. एकाच जिल्ह्यात दोन पेक्षा अधिक मंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. राज्यमंत्र्यांनाही पालकमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. यामुळेच पालकमंत्रीपदाचा तिढा सुूटू शकलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आठवडाभर परदेश दौऱ्यावर होते. ते आता परतल्याने मुख्यमंत्री फडणवीस पवार व एकनाथ शिंदे या दोन उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना आपापला प्रभाव असलेल्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद हवे आहे. पालकमंत्र्यांची नियुक्ती दोन-तीन दिवसांत होईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी सांगितले होते.

पालकमंत्रीपदावरून उफाळलेला वाद लक्षात घेता पूर्वीप्रमाणे बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव विचारात आहे. पण त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे अनुकूल नाहीत. भाजपमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते. तिन्ही पक्षांची त्याला मान्यता लागेल.

हेही वाचा >>>महारेराची स्वायत्तता धोक्यात? नोंदणी, तक्रारीसह इतर बाबींपोटी जमा होणाऱ्या शुल्कावर सरकारचा अधिकार

घोळ कायम…

● मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप जाहीर होताच रायगड, सातारा, नाशिक, बीड, पुणे, संभाजीनगर, ठाणे अशा काही जिल्ह्यांमधून पालकमंत्रीपदावर दावा करणाऱ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

● बीडमधील संतोष देशमुख यांची हत्या व त्यावरून धनंजय मुंडे हे संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने मुंडे यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपवू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

● संजय शिरसाट व भरत गोगावले यांनी आपणच अनुक्रमे संभाजीनगर आणि रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री होणार हे जाहीर करून टाकले.

● सुनील तटकरे हे आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळावे, यासाठी आग्रही आहेत.

● साताऱ्यात चार मंत्री असल्याने प्रत्येकालाच पालकमंत्रीपद हवे आहे.

● मुख्यमंत्री हे सहसा कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवत नाहीत. मुख्यमंत्री हे राज्याचेच पालकमंत्री मानले जातात. पण फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवण्याचा विचार करीत आहेत.