‘म्हाडा’च्या वतीने बांधण्यात येणाऱ्या घरांच्या किंमती जास्त असल्याने त्यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली असली तरी या किंमती खासगी विकासकांपेक्षा ४० टक्क्य़ांनी कमी असल्याने त्यात बदल करण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी नकार दिला.
गेल्या आठवडय़ात ‘म्हाडा’च्या वतीने सदनिकांकरिता जाहिरात करण्यात आली. घरांच्या किंमतींवरून सर्वसामान्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया असताना या घरांच्या किंमती जास्त असल्याचा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला. या घरांच्या किंमती जास्त असल्याने त्यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. घरांच्या किंमतीवरून गृहनिर्माण खात्याचे राज्यमंत्री सचिन अहिर यांनीही नापसंती व्यक्त केली होती. मुख्यमंत्री चव्हाण यांनी मात्र हे आक्षेप फेटाळून लावले. ‘म्हाडा’ने जाहीर केलेल्या घरांच्या किंमतीचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन केले. ‘म्हाडा’च्या वतीने बांधण्यात येणारी घरे आणि त्याच परिसरात खासगी विकासकांच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या घरांच्या किंमतींची तुलना केल्यास ‘म्हाडा’च्या घरांच्या किंमती ४० टक्के कमी असल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. घरे बांधण्यास येणारा खर्च लक्षात घेऊनच या किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. ‘म्हाडा’ नफेखोरी करीत नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी केले.
सर्वसामान्यांना परवडतील अशा दरांमध्ये मुंबईत घरे उपलब्ध झाली पाहिजेत, अशी सरकारची भूमिका आहे. त्यानुसार घरांचा साठा उपलब्ध झाला पाहिजे, अशा सूचना ‘म्हाडा’ला करण्यात आल्या आहेत. याचाच भाग म्हणून खासगी विकासकांवर २० टक्के सदनिका छोटय़ा आकाराच्या असाव्यात, अशी सक्ती करण्यात आली आहे.
घरांच्या किंमतीवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपण्याची चिन्हे आहेत. कारण राष्ट्रवादीने हा मुद्दा तापविण्यावर भर दिला आहे. ‘म्हाडा’ आणि मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या कारभारावरून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याची राष्ट्रवादीची योजना आहे.
घरांच्या किंमतीत बदल नाहीच
‘म्हाडा’च्या वतीने बांधण्यात येणाऱ्या घरांच्या किंमती जास्त असल्याने त्यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली असली तरी या किंमती खासगी विकासकांपेक्षा ४० टक्क्य़ांनी कमी असल्याने त्यात बदल करण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी नकार दिला. गेल्या आठवडय़ात ‘म्हाडा’च्या वतीने सदनिकांकरिता जाहिरात करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-05-2013 at 05:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No change in mhada flats rate say chief minister