विधानभवनासमोरील वाहनतळात सीएनजी पंप सुरू करण्याच्या नगरविकास खात्याच्या प्रस्तावास विधिमंडळ सचिवालयाने विरोध केला असून, कोणत्याही परिस्थितीत ही जागा दिली जाऊ नये, असा निर्णय घेण्यात आला आहे.
विधानभवनासमोरील मोकळी जागा २००४ मध्ये राज्य शासनाने वाहनतळाकरिता विधिमंडळ सचिवालयाकडे सुपूर्द केली. नरिमन पॉइंट परिसरात सीएनजी भरण्यासाठी पंप नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत एका स्वयंसेवी संस्थेने विधान भवनासमोरील मोकळ्या जागेत कोपऱ्यातील जागा मिळावी, अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती. यानुसार नगरविकास खात्याने तसा प्रस्ताव विधिमंडळ सचिवालयाकडे पाठविला आहे.
या प्रस्तावावर चर्चा करण्याकरिता विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. अधिवेशनाच्या काळात वाहने उभी करण्याकरिता वाहनतळाची जागा अपुरी पडते. परिणामी गाडय़ा रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात. तेव्हा सीनएजी पंपासाठी जागा कशाला द्यायची, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

Story img Loader