आम आदमी पक्षामध्ये सामील होण्याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही, असे प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी स्पष्ट केले आहे. ‘आप’चे नेते योगेंद्र यादव यांनी मेधा पाटकर यांच्या पक्षातील समावेशाबाबत वक्तव्य केले होते.या संदर्भात १२ जानेवारीला चळवळीतील कार्यकर्त्यांची येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे, त्यानंतर वर्धा येथे २३ आणि २४ जानेवारीला बैठक होईल. १५ जानेवारीनंतर आपल्या ‘आप’मधील प्रवेशाबाबत चित्र स्पष्ट होईल असे त्यांनी इंदोर येथे बोलताना सांगितले. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाची पाटकर यांनी स्तुती केली.