कळवा येथील वीज वाहिन्यांची देखभाल व दुरूस्ती महावितरणतर्फे होणार असल्याने शुक्रवारी कळव्यातील काही भागांतील वीज पुरवठा खंडीत होणार आहे. त्यामुळे विटावा गाव, सूर्यानगर, ऑक्ट्राय नाका, स्मशानभूमी, गणपत्तीपाडा, साईबाबा मंदिर रोड, भवानी चौक, पटणी कॉम्प्युटर, शंकर मंदिर रोड, वाघोबानगर, ईश्वरनगर, आनंदनगर, भोलानगर आदी परिसराचा वीज पुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत बंद राहणार आहे.
मुंब्रा भारनियमनमुक्त
रमजानसाठी मुंब्य्रात भारनियमन रद्द आहे. पण, काही समाजकंटक वीज पुरवठा खंडीत करीत आहेत. बुधवारी रात्री असाच प्रकार घडून दुरूस्तीसाठी गेलेला कंत्राटी कर्मचारी पाय घसरून पडून मयत झाला आहे. या पाश्र्वभूमीवर मुंब्य्रात २४ तास तक्रार निवारण कक्षासोबतच ५० कर्मचाऱ्यांचे विशेष पथक दिवस-रात्र सेवेसाठी तैनात करण्यात आले आहे.

Story img Loader