रिक्षा आणि टॅक्सीच्या मीटर कॅलिब्रेशनसाटी २४ नोव्हेंबर ही अंतिम मुदत असून त्यास मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र कॅलिब्रेशनची प्रक्रिया सुरूच राहणार असून तात्काळ कारवाईचा बडगा उचलण्याऐवजी पुढील आठवडय़ात राज्य शासनास प्रसताव पाठविण्याची मवाळ भूमिका परिवहन विभागाने घेतली आहे. कॅलिब्रेशनला मुदतवाढ देण्यासाटी मुंबई ग्राहक पंचायतने विरोध दर्शविला आहे. डॉ. हकीम समितीच्या शिफारशींप्रमाणे ११ ऑक्टोबर रोजी भाडेवाढ करण्यात आल्यावर ४५ दिवसांमध्ये मीटर कॅलिब्रेशन करम्यासाठी मुदत देण्यात आली होती.    

Story img Loader