दस-यानिमित्त मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर घेण्यात येणा-या मेगाब्लॉकला येत्या रविवारी (१३ ऑक्टोबर) सुट्टी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारऐवजी शनिवार १२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणा-या दस-याच्या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. मेगाब्लॉक रद्द केल्याने तिन्ही मार्गावर लोकल नियमित वेळेतच धावणार असून मुंबईकरांना दस-यानिमित्त दिलासा मिळाला आहे.
पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री साडेबारा वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत वसई रोड ते विरारदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात सर्व लोकल बोरीवली/वसई आणि विरार दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच, चर्चगेट-विरार लोकल विरार आणि वसई/बोरीवली दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.
दस-यानिमित्त रविवारी मेगाब्लॉक नाही
दस-यानिमित्त मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर घेण्यात येणा-या मेगाब्लॉकला येत्या रविवारी (१३ ऑक्टोबर) सुट्टी देण्यात आली आहे.
First published on: 12-10-2013 at 11:47 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No megablock on sunday