दस-यानिमित्त मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर घेण्यात येणा-या मेगाब्लॉकला येत्या रविवारी (१३ ऑक्टोबर) सुट्टी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारऐवजी शनिवार १२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणा-या दस-याच्या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. मेगाब्लॉक रद्द केल्याने तिन्ही मार्गावर लोकल नियमित वेळेतच धावणार असून मुंबईकरांना दस-यानिमित्त दिलासा मिळाला आहे.
पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री साडेबारा वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत वसई रोड ते विरारदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात सर्व लोकल बोरीवली/वसई आणि विरार दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच, चर्चगेट-विरार लोकल विरार आणि वसई/बोरीवली दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No megablock on sunday