दुबई, सिंगापूर आदी शहरांमध्ये किती चटईक्षेत्र निर्देशांक वापरायचा याचे अजिबात र्निबध नाहीत. मुंबईत वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक वापरून स्वस्तात घरे उपलब्ध होणार असल्यास तो वापरण्यास काहीच हरकत नाही, असे सांगत मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष संजय निरुपम यांनी वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकाचे सोमवारी समर्थनच केले.
मुंबईत स्वस्तात घरे उपलब्ध झाली पाहिजेत, असे आपले ठाम मत आहे. मग त्यासाठी जादा एफ.एस.आय. वापरला तर बिघडले कोठे, असा सवाल निरुपम यांनी केला. आरे कॉलनीत कोणत्याही बांधकामाला परवानगी देऊ नये, तसेच मेट्रोसाठी अन्य जागेचा पर्याय सुचवावा, अशी भूमिका मांडली.
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे मुंबईतील ‘नाइट लाइफ’साठी आग्रही असले तरी रात्रीच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध आहे का, असा सवालही निरुपम यांनी केला. आधीच पोलिसांना १२ तासांपेक्षा जास्त काळ सेवा करावी लागते. हे सारे लक्षात घेता ही मागणी योग्य नसल्याचे मत निरुपम यांनी मांडले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2015 रोजी प्रकाशित
निरुपम यांच्याकडून वाढीव चटईक्षेत्राचे समर्थन
दुबई, सिंगापूर आदी शहरांमध्ये किती चटईक्षेत्र निर्देशांक वापरायचा याचे अजिबात र्निबध नाहीत. मुंबईत वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक वापरून स्वस्तात घरे उपलब्ध होणार असल्यास तो वापरण्यास काहीच हरकत नाही, असे
First published on: 03-03-2015 at 02:46 IST
TOPICSसंजय निरुपम
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No need for cap on fsi in mumbai says sanjay nirupam