मुंबई महापालिकेचा २०१३-१४ या वर्षांसाठी शिक्षण विभागाचा २०.२८ कोटी रूपयांचा, शिलकीचा २४७२.५३ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आज (सोमवार) सादर करण्यात आला. गेल्यावर्षी १९७५.६२ कोटी रूपये असलेले बजेट यावर्षी १३९.८३ कोटी रूपयांनी वाढून २११५.४५ कोटी रूपये झाले आहे.
शिक्षण विभागासाठीच्या अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्टे
- ४०० शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम कुरू करणार.
- ८४ मराठी व ६४ उर्दु शाळांमध्ये गुणवत्ता वाढ प्रकल्प राबवणार
- कॅन्सर पीडित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा
- ५९ शाळांची दुरूस्ती हाती घेणार.
- शाळांची स्वच्छता, परिक्षण, सुरक्षेसाठी ३७.२९ कोटींची तरतूद
- शाळा गुणवत्ता वाढ प्रकल्पासाठी १५.६८ कोटींची तरतूद.
- २७८ नव्या वाचनालयांसाठी ३.८८ कोटींची तरतूद.
- शाळांमध्ये २२९० जलशुध्दीकरण यंत्रे बसवणार.
- सुगंधी दूधासाठी१३२.०१ कोटींची तरतूद.
- विद्यार्थी-शिक्षकांना क्षयरोगाची आणि मधूमेहाची माहिती देणार.
- विद्यार्थ्यांच्या बसभाडे योजनेसाठी २१ लाखांची तरतूद.
- १० वीला ६०% गुण मिळवणा-या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १२वी पर्यंत शिष्यवृत्ती.
- शाळेसाठी आवश्यक २७ वस्तूंचे पैसे पालक-विद्यार्थ्यांच्या बॅंकेच्या खात्यात पालिकेतर्फेच भरले जाणार.
- रस्त्यावरच्या मुलांसाठी मुंबई महानगरपालिका ४ वसतीगृहे सुरू करणार.