मुंबई : मुंबईचा विकास रोखणारे महाराष्ट्रद्रोही असून मराठी माणसाच्या मनात भय असेपर्यंत तो आपल्यामागे राहील, असे वाटत असल्याने केंद्र सरकारच्या औद्योगिक विकास आराखडय़ाला विरोध करण्यात येत आहे. पण मुंबईची घोडदौड कुणीही थांबवू शकत नाही आणि कोणाचाही बाप आला, तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही, असे  प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महायुतीच्या वरळी क्रीडा केंद्रात झालेल्या मेळाव्यात केले. 

हेही वाचा >>> Video: “..तोपर्यंत कुणाचा बाप मुंबई वेगळी काढू शकत नाही”, अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं!

Agitation of farmers affected by canal leakage to stop circulation of Nilwande Dam
निळवंडे धरणाचे आवर्तन बंद पाडण्यासाठी कालव्याच्या गळतीमुळे त्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Sangli married woman Abuse , Sangli Abuse,
सांगली : विवाहितेवर अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा
badlapur case protest mahavikas aghadi
राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार आहे का? बदलापूर प्रकरणातील बंदविरोधात न्यायालयाने काय निर्णय दिला?
High Court, Maha vikas Aghadi, Maharashtra bandh, Badlapur incident, bandh, unconstitutional, 2004 judgment, latest news, loskatta news,
महाविकास आघाडीला महाराष्ट्र बंद करण्यास मज्जाव, बंद बेकायदा असताना तो पुकारलाच कसा ? उत्तर दाखल करण्याचे आदेश
Mumbai, Sanjay Gandhi National Park, slum rehabilitation, High Court order, illegal encroachments, forest management, state government,
राष्ट्रीय उद्यान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश, बेकायदा झोपडीधारकांच्या तातडीच्या पुनर्वसनासाठी धोरण आखण्याबाबत सूचना
Sindhudurg, Husband tried to kill himself,
सिंधुदुर्ग : पती पत्नी वादातून नवऱ्याने तीन मुलांसह स्वतःवर पेट्रोल ओतून ठार मरण्याचा केला प्रयत्न
Nashik, minor girl, stepfather, abuse, threat, Ozar, police arrest, sugarcane field
नाशिक : अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्याचा अत्याचार

केंद्राच्या मदतीने दीड लाख कोटी रुपये उभारून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक लोकसभा जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले आहेत, असे समजून एकदिलाने लढून राज्यातील सर्व ४८ जागांवर महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तर युती करताना पक्षाच्या ध्येयधोरणांशी तडजोड होणार नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकारी पक्षांच्या नेत्यांबद्दल टीकाटिप्पणी टाळून संघर्ष न करण्याचे आवाहन महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले.

निती आयोगाने मुंबईचा आर्थिक विकास आराखडा तयार करण्याची सूचना केली असून त्यावरून विरोधकांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप केला. त्याचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले, प्रत्येक शहराचा केवळ विकास आराखडा तयार करून उपयोग नसून आर्थिक व गुंतवणुकीचाही आराखडा तयार केला पाहिजे. त्या दृष्टीने केंद्र सरकारने २० शहरे निवडली  आहेत. उत्पन्नामध्ये मुंबई महानगर क्षेत्राचा वाटा सहा टक्के असून तो २० टक्क्यांवर न्यायचा आहे.  त्याबाबत चार महिन्यांत आराखडा तयार करण्यात येणार असून निती आयोग व केंद्र सरकार मदत करणार आहे. मुंबईचा विकास होत असल्याने जनतेचा बुद्धीभेद केला जात आहे असा आरोप फडणवीस यांनी केला.

हेही वाचा >>> अजित पवार भाषणाला उभे राहताच फडणवीस अचानक निघून गेले, नेमकं कारण काय? म्हणाले…

प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत

तीन पक्ष एकत्र असल्यावर कोणाला एखादी गोष्ट आधी मिळेल, कोणाला कमी मिळेल. मला काय मिळेल, असे प्रत्येकाला वाटत असते. पण मी काय देवू शकतो, ही भावना हवी. मोदी यांना आणखी पाच वर्षे मिळाली, तर देशाला मागे वळून पहावे लागणार नाही. मानापमान नाटय़ होऊ न देता एकमेकांना समजून घेऊन एकदिलाने पुढे जाण्याची गरज आहे. प्रत्येकाच्या आशा-आकांक्षा, अपेक्षा असतात. पण त्या सर्वाच्या पूर्ण होऊ शकत नाहीत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर देऊ

विरोधकांच्या आरोपांना व टीकेला कामातून उत्तर दिले जाईल, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, केंद्र सरकारच्या भक्कम पाठिंब्याने राज्य सरकारची विकासाच्या वाटेवर वाटचाल सुरू असून अजित पवारही बरोबर आल्याने ट्रिपल इंजिन सरकार वेगाने धावत आहे. इंडिया आघाडीत विविध पक्षांची एकजूट होणे शक्य नसून त्यांना अजून लोगोही एकमताने तयार करता आलेला नाही. विरोधकांना अहंकार आहे.

जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

‘ वन नेशन, वन इलेक्शन ’ या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. वेगवेगळय़ा काळात निवडणुका झाल्या, तर विकास कामे ठप्प होतात असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. निती आयोगाच्या बैठकीनंतर मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न असल्याची ओरड  ही जनतेची दिशाभूल आहे. हा आरोप खरा असेल, तर वाराणसी उत्तर प्रदेशपासून, सुरत गुजरातपासून आणि विशाखापट्टणम आंध्र प्रदेशपासून तोडायचे आहे का ? उलट पुढील काळात पुणे, पिंपरी-चिंचवडचीही  निवड करावी, अशी विनंती मी केली आहे.