‘एमआयएम’चे आमदार अकबरउद्दीन ओवेसी यांच्या आज नागपाडा येथे होणा-या जाहीर सभेला मुंबई पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत जाहीर सभा घेऊ नये आणि घ्यायची असल्यास बंदिस्त सभागृहात घ्यावी असे मुंबई पोलिसांनी ओवसींना बजावले. नागपाडा जंक्शन येथे आज सायंकाळी ७ वाजता अकबरउद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा ‘एमआयएम’च्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. ओवेसी यांना जाहीर सभेस परवानगी नाकारण्यात आली आहे. तरी बंदिस्त सभागृहात सभा घेण्यास मनाई करण्यात आलेली नाही, असे पोलीस उपायुक्त एस. जयकुमार म्हटले आहे.
ओवेसींच्या मुंबईतील जाहीर सभेला पोलिसांची हरकत
‘एमआयएम’चे आमदार अकबरउद्दीन ओवेसी यांच्या आज नागपाडा येथे होणा-या जाहीर सभेला मुंबई पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली.
First published on: 07-02-2015 at 04:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No permission for owaisis open meeting in mumbai