‘एमआयएम’चे आमदार अकबरउद्दीन ओवेसी यांच्या आज नागपाडा येथे होणा-या जाहीर सभेला मुंबई पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत जाहीर सभा घेऊ नये आणि घ्यायची असल्यास बंदिस्त सभागृहात घ्यावी असे मुंबई पोलिसांनी ओवसींना बजावले. नागपाडा जंक्शन येथे आज सायंकाळी ७ वाजता अकबरउद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा ‘एमआयएम’च्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.  ओवेसी यांना जाहीर सभेस परवानगी नाकारण्यात आली आहे. तरी बंदिस्त सभागृहात सभा घेण्यास मनाई करण्यात आलेली नाही, असे पोलीस उपायुक्त एस. जयकुमार म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा