महावितरण कंपनीकडून ठाण्यात दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने आज दुपारी १ ते ५ यावेळेत ठाण्याच्या विविध भागांतील विद्युत पुरवठा बंद राहणार आहे.महावितरण कडून ठाण्यातील कोलशेत येथे वीज वाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी कोलशेत उपविभागातील काही भागांचा विद्युत पुरवठा बंद करणे आवश्यक आहे. यामुळे या विभागांतर्गत येणाऱ्या वसंत विहार, लोकपूरम, उपवन, सिद्धांचल, गांधीनगर, नळपाडा आणि पवारनगर याभागांतील विद्युत पुरवठा बंद राहणार केला जाणार आहे. दुपारी १ ते सायंकाळी ५ यावेळेत हा विद्याुत पुरवठा बंद केला जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No power supply in parts of thane city and surroundings today