सिनेमातील धूम्रपानाच्या दृश्याआधी ‘धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे’, असा संदेश देणारी सूचना दाखविणे बंधनकारक करण्याविरोधात दिग्दर्शक अनुराग कश्यप याने उच्च न्यायालयात धाव घेत ती रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने कश्यप याला दिलासा देण्यास नकार दिल्याने सिनेमातील धूम्रपानाच्या दृश्याआधी ‘धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे’, असा संदेश देणारी सूचना दाखवावीच लागणार आहे.  
मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्या. मनोज संकलेचा यांच्या खंडपीठासमोर अनुरागच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळेस याप्रकरणी कश्यप याला कुठल्याही प्रकारचा अंतरिम दिलासा दिला जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले.  
तंबाखू आणि तत्सम उत्पादकांचे उत्पादन, पुरवठा, जाहिरात, पुरवठा प्रतिबंधक कायद्याचा आधार घेत केंद्र  सरकारने सेन्सॉर बोर्डाला  सिनेमातील धूम्रपानाच्या दृश्याआधी ‘धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे’, असा संदेश देणारी सूचना दाखविणे बंधनकारक करण्यास सांगितले होते. मात्र आपल्या ‘अग्ली’ या सिनेमातील धूम्रपानाच्या दृश्याआधी आपण धूम्रपानविरोधी सूचना दाखविणार नाही, अशी भूमिका अनुरागने घेतली होती. त्याच्या भूमिकेनंतर सेन्सॉर बोर्डाने सिनेमा प्रसिद्ध करण्यास मज्जाव केला आहे. त्या विरोधात अनुरागने ही सूचना दाखविणे बंधनकारक करणाऱ्या अधिसूचनेलाच आव्हान दिले. ही सूचना दाखविणे हे आपल्या सर्जनशील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आणि मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, असा दावा याचिकेत केला आहे. आपला सिनेमा म्हणजे धूम्रपानाची जाहिरात नाही, असेही त्याने म्हटले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा