दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुरविण्यात आलेली वैयक्तिक सुरक्षा पुढील आठवडय़ात काढण्यात येणार आहे. बाळासाहेबांचे निधन झाल्यानंतर ही सुरक्षा हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. परंतु जनभावना लक्षात घेता तो निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला होता. आता मात्र ती पुढील आठवडय़ात काढली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शिवसेनाप्रमुख गेल्या अनेक वर्षांपासून अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर होते. त्यामुळे त्यांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यात दोन पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षकांसह १६ सशस्त्र पोलिसांचा ताफा होता. शिवसेनाप्रमुखांबरोबरच मातोश्री हे निवासस्थानही संवेदनशील बनले होते. त्यामुळे मातोश्रीचे मुख्य प्रवेशद्वार आणि कलानगर जंक्शनलरही सुरक्षा ठेवण्यात आली होती.
यासंदर्भात अतिरीक्त पोलीस आयुक्त (संरक्षण) मधुकर पांडे यांनी सांगितले की, मातोश्रीबाहेर सध्या राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात आहे. तेथे ४० हून अधिक पोलिसांचा ताफा असतो. मातोश्री संवेदनशील असल्याने सध्या तरी हा बंदोबस्त काढला जाणार नाही. परंतु वैयक्तिक सुरक्षा पुढील आठवडय़ात काढली जाईल. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत कुठलाही बदल होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा