बालाजी तांबे यांच्या वतीने पुत्र सुनील तांबे यांचा खुलासा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकाच्या माध्यमातून पुत्रप्राप्ती वा लिंगनिवडीचा प्रचार-प्रसार केलेला नाही, असा खुलासा प्रसिद्ध आयुर्वैद्य बालाजी तांबे यांच्या वतीने त्यांचे पुत्र सुनील तांबे यांनी केला आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्याने बजावलेल्या ‘कारणे दाखवा’ नोटिशीलाही सविस्तर उत्तर देण्यात आले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

आयुर्वेदीय गर्भसंस्कार पुस्तकात पुत्रप्राप्तीचे उपाय सुचवून त्याचा प्रचार व प्रसार केल्याने गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनडीटी) भंग केल्याचा ठपका ठेवत संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजीव घोडके यांनी बालाजी तांबे यांना पुढील  कारवाईसाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या संदर्भात ‘लोकसत्ता’च्या ६ जानेवारीच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्याबाबत तांबे यांच्यावतीने हा खुलासा करण्यात आला आहे. आयुर्वेद, योग, योग्य आहार व नियोजनाच्या मदतीने सुदृढ मुलाचा जन्म व्हावा हा ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. हे पुस्तक लिंगनिवडीसाठी किंवा पुत्रप्राप्तीसाठी उपाय सुचविण्यासाठी प्रकाशित केलेले नाही. नोटिशीत ज्या मजकुराचा उल्लेख केला आहे, तो मुळात चरक शरीरस्थान, अष्टांग संग्रह, आयुर्वेदीय महाकोष-भाग-२, चरक संहिता, कौमार भ्रत्यतंत्र इत्यादी आयुर्वेदावरील  पुस्तकांतील मजकुराचे पुनर्मुद्रण आहे. ही जुनी पुस्तके सर्वत्र उपलब्ध आहेत.  पुंसवनविधी पुत्रप्राप्तीचा  विधी नसून अपत्यामध्ये निसर्गचक्र सुरु राहण्यासाठी अपत्यनिर्मितीची क्षमता निर्माण करण्यासाठीचा विधी आहे, असा खुलासा तांबे यांनी केला आहे.