अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकातील तरतुदींना विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. भारतीय दंड विधानातील तरतुदींनुसार गुन्हे नोंदविता येत असतील, तर वेगळ्या कायद्याची आवश्यकता नाही. या विधेयकात केवळ हिंदू धर्मीयांविरुद्धच तरतुदी असतील तर ते सहन केले जाणार नाही, असे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी रविवारी स्पष्ट केले. त्यामुळे या विधेयकास या अधिवेशनातही मूहूर्त मिळण्याची चिन्हे नाहीत.
जादूटोणा, नरबळी आदींना आमचा विरोधच आहे. पण या गुन्ह्य़ांसाठी भारतीय दंड विधानानुसार कारवाई करता येते. केवळ हिंदू विरोधात विधेयकात तरतुदी असल्यास ते सहन केले जाणार नाही, असे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. श्रद्धांना दुखविले जाणार असेल व अन्य धर्मीयांबाबत काहीच उल्लेख नसेल, तर यास तीव्र विरोध करण्याचे शिवसेनेचे दिवाकर रावते यांनी जाहीर केले.