मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र धरणांतील उपलब्ध पाणी आणि राखीव साठा मिळून उपलब्ध झालेले पाणी ३१ जुलैपर्यंत पुरेल अशा पद्धतीने नियोजन करण्यात आल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करू नये. मात्र सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले आहे. यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पाणी कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत मिळून सध्या १६.४८ टक्के पाणी साठा आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा सर्वात कमी आहे. पुरेसा पाऊस पडेपर्यंत पुढील दोन – अडीच महिने हा पाणीसाठा पुरवावा लागणार आहे. त्यामुळे पाणीसाठ्याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी पालिका मुख्यालयात भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे यांच्यासह जलअभियंता विभागातील अधिकारी उपस्थित होते. पाणी कपातीची सध्या तरी आवश्यकता नसल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

harbhara farming
लोकशिवार: किफायतशीर हरभरा!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Rain Maharashtra, Rain in Diwali, Rain,
फटाक्यांच्या मोसमात पावसाची आतषबाजी, महाराष्ट्रात पुन्हा…
Pune Municipal Corporation faces the challenge of preventing 40 percent water leakage
लोकजागर : ४० टक्के पाणीगळती रोखा, मग कौतुक करा!
MP sandipan Bhumre, vilas bhumre, liquor shop permits
खासदार भुमरे कुटुंबाकडे मद्यविक्रीचे किती परवाने?
water supply in pune hadapsar magarpatta area will be closed
हडपसर, मगरपट्टा भागातील पाणीपुरवठा ‘ या ‘ दिवशी राहणार बंद, हे आहे कारण !
lokjagar nepotism in the political families kin of influential leaders get ticket for assembly polls
लोकजागर : घराणेशाहीच्या टीकेला ‘घरघर’
Muddy and smelly water
मुंबई: पूर्व उपनगरात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी; भातसा पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी, महापालिकेचा दावा

हेही वाचा… शिष्यवृत्तीचा तपशील सादर न करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांवर कारवाई, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने उचलली कठोर पावले

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत कमी पाणीसाठा असला तरी मुंबईसाठी राज्य शासनाने यापूर्वीच भातसा व अप्पर वैतरणा जलाशयातून अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून प्रतिवर्षाप्रमाणे ३१ जुलै २०२४ पर्यंत पुरेल, अशा रीतीने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन केले आहे, असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे, यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होण्यासाठी सध्या अनुकूल स्थिती आहे. त्याचप्रमाणे देशात यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज याआधीच वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या तरी पाणी कपात लागू करण्यात आलेली नाही.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये मिळून ७ मे रोजी २ लाख ३८ हजार ५५२ दशलक्ष लिटर म्हणजचे १६.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सातही धरणांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. यापैकी केवळ १६.४८ टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. त्याचप्रमाणे, भातसा धरणातून एक लाख ३७ हजार दशलक्ष लिटर, तर अप्पर वैतरणा धरणातून ९१ हजार १३० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे.

हेही वाचा… मानखुर्दमध्ये विषबाधेमुळे तरुणाचा मृत्यू, रस्त्यावर तयार केलेले बर्गर खाल्ल्यामुळे १२ जणांना विषबाधा

निवडणुकीनंतर पाणी कपात ?

सध्या लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय प्रशासन घेत नसल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. मात्र लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर पाणी कपात लागू होण्याची शक्यता आहे. मे अखेरीस हवामान खात्याकडून मान्सूनविषयक अद्ययावत अंदाज वर्तवले जाणार आहेत. हवामान खात्याकडून वेळोवेळी वर्तवले जाणारे पावसाचे अंदाज, त्याचप्रमाणे पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेवून महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. त्यामध्ये होणारे बदल लक्षात घेवून आगामी काळातील धोरण निश्चिती केली जाईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे जूनपर्यंत पाणी कपात लागू करण्याची वेळ येऊ शकते.

पाण्याचा काटकसरीने वापर करा – गगराणी

पाणीसाठ्याची उपलब्धता लक्षात घेता सध्या मुंबईत कोणतीही पाणीकपात लागू केलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करण्याचे कारण नाही. असे असले तरी, वैयक्तिक स्तरावर सर्व नागरिकांनी आपल्या सवयींमध्ये, त्याचप्रमाणे मुंबईतील सर्व व्यावसायिक व वाणिज्यिक आस्थापनांनी देखील आपल्या कार्यपद्धतीमध्ये असे बदल स्वीकारावेत की ज्यातून पाण्याची बचत होईल, पाण्याचा अपव्यय रोखता येईल. पाण्याचा सर्वांनी काटकसरीने वापर करावा, पाणी बचतीच्या उपायांचा अवलंब करावा, असे आवाहन भूषण गगराणी यांनी केले आहे.