ठाणे महापालिकेच्या वतीने अत्यावश्यक देखभाल तसेच दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्यामूळे मंगळवार ५ फेब्रुवारी रोजी ठाणे शहाराचा पाणी पुरवठा पुर्णत: बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेला स्टेम वॉटर कंपनीकडून होणारा पाणी पुरवठा तसेच महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठय़ांतर्गत महत्वाचे काम केले जाणार आहे. हे काम करताना पाणी पुरवठा बंद ठेवणे आवश्यक आहे. यामुळे शहाराच्या पाचपाखाडी, ऋतुपार्क, साकेत, महागिरी, नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, इंदिरानगर, श्रीनगर, शास्त्रीनगर, खारेगाव, रेतीबंदर, मुंब्रा, समतानगर, गांधीनगर, घोडबंदर, आझादनगर, डोंगरीपाडा, ओवळा, वाघबीळ, माजिवाडा, बाळकुम, मानपाडा, ढोकाळी, कोलशेत, ब्रह्मांड, पवारनगर, टिकुजिनीवाडी, विजयनगरी, खारटन रोड या परिसरांतील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाणी पुरवठा पुर्णत: बंद केला जाणार असल्यामूळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाण्यात मंगळवारी पाणी नाही
ठाणे महापालिकेच्या वतीने अत्यावश्यक देखभाल तसेच दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्यामूळे मंगळवार ५ फेब्रुवारी रोजी ठाणे शहाराचा पाणी पुरवठा पुर्णत: बंद राहणार आहे.
First published on: 02-02-2013 at 01:47 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No water in thane on tuesday