ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात महावितरणतर्फे देखभालीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवार १२ जुलै रोजी या परिसरातील विजपुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत बंद राहणार आहे.  ज्ञानेश्वरनगर, राजीव गांधी नगर, विश्वशांती नगर, जय भवानीनगर, पाइप लाइन, रस्ता क्रमांक-१६,२९,३०,३१, आंबेवाडी, कृषी कार्यालय, इ.एस.आय.एम हॉस्पिटल, किसननगर औद्योगिक विभाग, श्रीनगर, डिसुजावाडी, शांतीनगर, हिरामोतीनगर, शिवाजी नगर, भटवाडी, पडवळनगर, शिव टेकडी, हनुमाननगर, रामनगर, सी.पी.तलाव, आयटीआय, इंदिरानगर, रुपादेवी पाडा, सायबरटेक कंपनी, टीएमटी डेपो, नायर ब्रदर, आंबेडकरनगर, जोस्त बिल्डिंग, सीपी तलाव या भागांतील पुरवठा बंद राहील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No water supply in thane today