ठाणे महापालिकेच्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा अत्यावश्यक दुरूस्तीच्या कामासाठी बुधवारी बंद राहणार असून त्यापुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. अत्यावश्यक दुरूस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे शुक्रवारी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार होता. मात्र, त्या दिवशी काही कारणास्तव काम करण्यात आले नाही. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होता, असे पालिकेने स्पष्ट केले.
ठाणे शहराचा पाणी पुरवठा ११ डिसेंबर, सकाळी ९ ते १२ डिसेंबर सकाळी ९ या वेळेत बंद राहणार आहे. तसेच पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, असे महापालिकेने पत्रकाद्वारे कळविले आहे. यापुर्वी याच योजनेचे काम हाती घेण्यात आले होते, त्या वेळी ठाणेकरांनी पाणी टंचाईचा सामना केला होता. आता याच पाणी पुरवठा योजनेच्या दुरूस्तीचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा २४ तास बंद राहणार आहे.
येथे पाणी नाही
ठाणे शहर, पाचपखाडी, ऋतूपार्क, साकेत, महागिरी, लोकमान्यनगर, नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, इंदीरानगर, मुंब्रा, श्रीनगर, शास्त्रीनगर, सुरकरपाडा, जॉन्सन, इटरर्निटी, सिद्धेश्वर, महागिरी, वृंदावन, श्रीरंग, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर, मुंब्रा, समतानगर, गांधीनगर, घोडबंदर रोड, आझादनगर, डोंगरीपाडा, ओवळा, वाघबीळ, माजिवडा, बाळकुम, मानपाडा, ढोकाळी, कोळशेत, ब्रह्मांड, पवारनगर, टिकूजीनीवाडी, विजयनगरी़
उद्या ठाण्यात पाणी नाही
ठाणे महापालिकेच्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा अत्यावश्यक दुरूस्तीच्या कामासाठी बुधवारी बंद राहणार असून त्यापुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
First published on: 10-12-2013 at 01:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No water supply in thane tomorrow