ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेमधून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवारी बंद राहणार असून, त्यानंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी येणार आहे. शुक्रवार सकाळी ९ ते शनिवारी सकाळी ९ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. पंधरा दिवसांपूर्वी अशाच प्रकारे दुरुस्तीच्या कामानिमित्ताने शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे ठाणेकरांचे हाल झाले होते. पुन्हा याच पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीकरिता शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या ठिकाणी पाणी नाही..
ठाणे शहर, पाचपाखाडी, ऋतुपार्क, साकेत, महागिरी, लोकमान्यनगर, नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, मुंब्रा, समतानगर, गांधीनगर, घोडबंदर रोड, आझादनगर, डोंगरीपाडा, ओवळा, वाघबीळ, माजिवडा, बाळकुम, मानपाडा, कोलशेत, ब्रह्मांड, पवारनगर, टिकूजीनीवाडी, विजयनगरी या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच या कामानंतर पाणीपुरवठा सुरू झाल्यावर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, असे महापालिकेने कळविले आहे.

Story img Loader