मुंबई : एकीकडे मुंबईमधील खालावलेला हवेचा दर्जा सुधारण्यासाठी यंत्रणांची तारांबळ उडाली आहे. तर या पार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीत फटाक्यांमुळे ध्वनी, वायू प्रदूषणात भर पडण्याची भिती व्यक्त होत आहे. करोनाच्या संकटाचे ढग विरळ झाल्यानंतर गेल्यावर्षी नागरिकांनी फटाक्यांची आतशबाजी करीत दिवाळी साजरी केली. मात्र पर्यावरणस्नेही फटाक्यांमधील बोरियमसह अन्य काही घातक रासायनिक घटक आढळल्यामुळे चिंतेत भर पडली होती. यंदा मुंबईच्या हवेच्या दर्जा घसरला असताना आता फटाक्यांमुळे तो आणखी खालावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाप्रमाणेच दिवाळीसाठीही मार्गदर्शक तत्वे लागू करणार का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

दरवर्षी दिवाळीमधील लक्ष्मीपूजन, भाऊबीज या दिवशी मोठ्या प्रमाणावर मरिन ड्राईव्ह येथे आतषबाजी होते. कानठळ्या बसविणाऱ्या आणि प्रदूषणकारी फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून बाजारांमध्ये पर्यावरणस्नेही फटाके (ग्रीन क्रॅकर्स) विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. या फटाक्यांचा मोठा आवाज होत नसला तरी त्यातून बाहेर पडणारा धूर घातक असल्याचे एका पाहणी अहवालातून समोर आले आहे.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
Strategies to Counter Terrorism Amit Shah statement at the conference of National Investigation Agency
दहशतवादाचा सामना करण्याची रणनीती; राष्ट्रीय तपास संस्थेच्या परिषदेत अमित शहा यांचे प्रतिपादन

हेही वाचा – रवींद्र वायकर यांच्याविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल

गेली काही वर्षे आवाज फाऊंडेशनतर्फे गणेशोत्सवात आगमन – विसर्जन मिरवणुका, नवरात्रोत्सवात दांडियाचे आयोजन असलेल्या ठिकाणी ध्वनी पातळी मोजण्यात येते. तर दिवाळीमध्ये फटाक्यांची तपासणी करून अहवालही जारी करण्यात येतो. आवाज फाऊंडेशनने गेल्या दोन वर्षांमधील फटाक्यांची तपासणी करून अहवाल जारी केला आहे. गेल्यावर्षी विक्रीसाठी मुंबईत आलेल्या पर्यावरणस्नेही फटाक्यांमध्ये बेरियम, आर्सेनिक, सल्फर, क्लोरिन, ॲल्युमिनियम, सल्फर पोटॅशियम, सिलिकॉन, लोह, टायटॅनियम आदी मानवी आरोग्यास घातक रासायनिक घटक आढळून आले आहेत. काही फटाक्यांवर क्यूआर कोड, तसेच काही फटाक्यांच्या वेष्टनावर त्यातील घटकांची माहिती नमुद नसल्याचे सर्वेक्षणादरम्यान निदर्शनास आले आहे. या फटाक्यांची आवाजाची पातळी ७१.४ ते ११४ डेसिबल दरम्यान होती. परिणामी, पर्यावरणस्नेही फटाक्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये कानठळ्या बसविणाऱ्या आणि वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणारे फटाके फोडण्यापासून मुंबईकर परावृत्त होऊ लागले आहेत. त्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांच्या आतशबाजीचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र असे असले तरी पर्यावरणस्नेही फटाक्यांची बाजारपेठ तेजीत आली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळून दिवाळी साजरी करणाऱ्या मंडळींचा पर्यावरणस्नेही फटाक्यांकडे कल वाढू लागला आहे. मात्र आता या फटाक्यांमध्ये घातक रासायनिक घटक असल्याचे आवाज फाऊंडेशनच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या फटाक्यांचीही तपासणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पर्यावरणस्नेही फटाक्यांमध्येही मानवी आरोग्यास घातक रासायनिक घटक आढळले आहेत. या फटाक्यांचा आवाज होत नसला तरी ते प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. या फटाक्यांची योग्य ती तपासणी करणे आवश्यक आहे. केवळ मोठा आवाज आणि वायू, ध्वनी प्रदूषण करणाऱ्याच नव्हे तर प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या सर्वच प्रकारच्या फटाक्यांवर बंदी आवश्यक आहे, असे आवाज फाऊंडेशनच्या सुमायरा अब्दुल अली यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

हेही वाचा – मुंबई : कोनमधील गिरणी कामगारांच्या घरांची ७० टक्के दुरुस्ती पूर्ण, दिवाळीनंतर ५०० कामगारांना चावी वाटप

मुंबईतील हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे. दरवर्षी फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणात भर पडत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडू लागला आहे. सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने फटाक्यांबाबत योग्य तो निर्णय घ्यावा आणि वाढत्या प्रदूषणाच्या धोक्यातून मुंबईकरांची सुटका करावी, अशी मागणी समाजसेवक अतुल दाभोळकर यांनी केली.

बोरियममुळे डोळे चुरचुरणे, त्वचेला खाज सुटणे, उलट्या, जुलाब, डोकेदुखी, आकडी येणे यांसारखे विकार होण्याची शक्यता असते. आर्सेनिक सल्फर थाेड्या वेळात जास्त प्रमाणात वातावरणात सोडले गेल्यास त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो आणि नागरिकांना पोटात दुखणे, उलट्या, जुलाब, डोकेदुखी सारख्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे नागरिकांना खोकला, दमा व त्वचेचे विकारही होण्याची शक्यता असते. आर्सेनिक सल्फर बराच वेळ वातावरणात राहिल्यास नागरिकांचा त्वचा, मूत्राशय आणि फुप्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. क्लोरिन हा फटाक्यांमध्ये वापरण्यात येणारा एक घातक घटक आहे. तो सातत्याने त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचेवरील पेशी नष्ट होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांना मोठ्याप्रमाणात त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते, असे सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले.