बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनाने रिक्त असलेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी कुपेकर यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे.
तेथून त्यांचा पुतण्याही उमेदवारीसाठी अडून बसला होता. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे मोठा प्रश्न होता. मात्र पुतण्याला पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा असलेला विरोध लक्षात घेता शेवटी कुपेकर यांच्या पत्नीची निवड झाली. ही उमेदवारी पोटनिवडणुकीपुरती असून, २०१४ मध्ये वेगळा विचार केला जाईल, असे सांगत पुतण्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मात्र पक्षाने केला आहे.

Story img Loader