राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, पुतणे समीर भुजबळ हे दोघेही तुरूंगात असताना आता पंकज भुजबळ यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. मनी लाँड्रींग प्रकरणी विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज यांच्यासह आणखी ३४ जणांविरोधात हे अटक वॉरंट बजावले आहे.
भुजबळ काका-पुतण्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
दरम्यान, महाराष्ट्र सदन आणि अन्य आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सध्या अटकेत असलेले छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यासमोर अडचणी कायम आहेत. दोघांच्याही न्यायालयीन कोठडीत आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. दोघांनाही ११ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
आणखी वाचा