किंगफिशर एअरलाईन्सचे मालक विजय मल्ल्या यांच्याविरोधात मनी लॉड्रींगप्रकरणी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. याशिवाय, परदेशात संपत्ती खरेदीसाठी विजय मल्ल्या यांनी आयडीबीआयकडून घेतलेल्या ४३० कोटींच्या कर्जाचा वापर केल्याच्या अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) दाव्याविरोधात किंगफिशरकडून दाखल करण्यात आलेली याचिका देखील न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाकडून विजय मल्ल्यांचा पासपोर्ट स्थगित 

‘ईडी’ने विजय मल्ल्यांविरोधात केलेले दावे खोटे आणि चूकीचे असल्याचे सांगत किंगफिशर एअरलाईन्स कंपनीने मुंबई सेशन्स कोर्टात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने विजय मल्ल्या यांनाच धक्का देत त्यांच्याविरोधात अजामीनपत्र अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले.

Story img Loader