आयडीबीआयच्या ९०० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी उद्योगपती विजय मल्या यांच्या विरोधात गैरव्यवहार प्रतिबंधक कायदाअंतर्गत (पीएमएलए) स्थापित विशेष न्यायालयाने सोमवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले. याबाबतच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अर्जावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. सोमवारी न्यायालयाने ‘ईडी’ची विनंती मान्य केली. मल्या यांनी ‘किंगफिशर एअरलाइन्स’साठी आयडीबीआयकडून ९५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु त्यांनी यापैकी ४३० कोटी रुपये हे परदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी खर्च केल्याचे समोर आले आहे. चौकशीचा फेरा टाळणाऱ्या मल्या यांना अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची विनंती ‘ईडी’ने केली होती.

Story img Loader