मुंबई : मध्य रेल्वेवर लोकल चालवताना मोटरमनकडून काही वेळा नकळतपणे सिग्नल नियम मोडला जातो. सिग्नलच्यापुढे काही फुटावर लोकल उभ्या केल्या जातात. या चुकीसाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक मोटरमनवर सक्तीच्या निवृत्तीची (सीआरएस) कारवाई सुरू आहे. त्यामुळे या कारवाईचा सर्व मोटरमननी धसका घेतला असून, या कारवाईच्या भीतीपोटी शुक्रवारी मोटरमन मुरलीधर शर्मा (५४) यांचा रेल्वे रूळ ओलांडताना अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर शुक्रवारपासून मध्य रेल्वेमधील बहुसंख्य मोटरमनचे ‘असहकार चळवळ’ सुरू केली असून ‘जादा काम’ करणे बंद केले. परिणामी, शनिवारी १०० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या असून यांच्या दुप्पट लोकल विलंबाने धावत होत्या. मध्य रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गंत वादाचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागला.

सीएसएमटीला जाणाऱ्या बहुसंख्य लोकल शनिवारी सकाळपासून उशिराने धावत होत्या. तसेच सीएसएमटीवरून कल्याणकडे जाणाऱ्या अनेक लोकल रद्द केल्याने प्रवाशांना कर्जत, कसारा लोकलवर अवलंबून राहावे लागले. तसेच शनिवारी सायंकाळच्या सुमारास सीएसएमटी – मस्जिददरम्यान एका मागे एक लोकलची रांग लागली होती. लोकल ३० मिनिटांहून अधिक काळ एकाच ठिकाणी थांबल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे मार्गावर उतरून पायी पुढील स्थानक गाठले. तसेच संपूर्ण दिवसभर कुर्ला, ठाणे, कल्याण, बदलापूर, वांद्रे, गोरेगाव, पनवेल, वाशी, अंबरनाथ, डोंबिवलीला जाणाऱ्या अनेक लोकल रद्द केल्या. त्यामुळे प्रत्येक रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती.

Biker dies in car collision in Deccan Gymkhana area Pune news
डेक्कन जिमखाना भागात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
is the police protecting reckless drivers
बेदरकार वाहनचालकांना पोलिसांचे अभय?
Murder in anger over being chased on a bike Kharghar crime news
दुचाकीवर हुलकावणी दिल्याच्या रागातून खून; खारघरमधील घटना
Accident
Accident : दाट धुक्याने घात केला! १२ प्रवासी असलेली क्रूझर कार कोसळळी कालव्यात; १० जण बेपत्ता
Passenger's leg gets stuck in the door driver did not stop the bus
“माणूसकी मेली!”, दरवाज्यात अडकला प्रवाशाचा पाय, चालकाने थांबवली नाही बस, धक्कादायक घटनेचा Video Viral
Navi Mumbai year 2024 road accidents navi mumbai police
नवी मुंबई : रस्ते अपघातांमध्ये वर्षभरात २८७ मृत
Container Truck Collides With Multiple Vehicles near the khambatki tunnel
खंबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकरसह तीन मोटारींचा अपघात; जिवीतहानी टळली, मोटारीचे मोठे नुकसान

हेही वाचा >>>ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा विविध स्तरांतून निषेध

https://x.com/PTI_News/status/1756346277783281680?t=jm6HPrciQ_RG3K8rcNx9sA&s=08

सोमवारी प्रवाशांची कोंडी होण्याची शक्यता

ऑल इंडिया एस.सी / एस.टी. रेल्वे एम्प्लॉयइज असोशिएशन, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, रेल कामगार सेना, मोटरमन / ट्रेन मॅनेजर उपनगरीय लाॅबीने शुक्रवारी सायंकाळी ‘जादा काम’ करणे बंद करण्याचा आणि प्रशासनाला सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पडसाद शनिवारी सकाळपासून उमटू लागले. मध्य रेल्वेने सकाळच्या सुमारास ‘एक्स’ ॲपवरून रद्द लोकलची माहिती प्रवाशांना दिली. सकाळी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवरील १५ लोकल आणि हार्बर मार्गावरील ५ लोकल रद्द केल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, शनिवारी संपूर्ण दिवसभरात शेकडो लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. रविवारी मेगाब्लॉक असल्याने लोकल फेऱ्या रद्द असतील. मात्र, सोमवारी मध्य रेल्वे प्रशासनाला पूर्ण क्षमतेने लोकल चालवताना अडचणी येणार आहेत. सोमवारी लोकल फेऱ्या रद्द झाल्यास प्रवाशांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

मोटरमन मुरलीधर शर्मा यांचा शुक्रवारी रेल्वे अपघातात मृत्यू झाला. शर्मा यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. बहुसंख्य मोटरमन शर्मा यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी तेथे गेले होते. त्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला. तसेच अनेक लोकल रद्द करण्याची वेळ आली. शनिवारी सुमारे २८ ते ३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

Story img Loader