लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दुकाने व आस्थानपनांवर मराठी भाषेत नामफलक लावण्यासाठी दिलेली मुदत संपल्यामुळे पालिका प्रशासनाने २८ नोव्हेंबरपासून मुंबईतील सर्व दुकाने व आस्थापनांची झाडाझडती सुरु असून गेल्या पंधरा दिवसात पालिकेने ३६ हजारांहून अधिक दुकाने व आस्थापनांची तपासणी केली आहे. या तपासणीत ३५ हजारांहून अधिक दुकाने व आस्थापनांनी मराठी फलकांची अंमलबजावणी केली असल्याचे निदर्शनास आले आहे.

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दुकानांवर मराठी देवनागरी ठळक लिपीत नावे लिहिणे अपरिहार्य करण्यात आले आहे. तसेच, दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलक लावण्यासाठी दिलेली मुदत संपुष्टात आल्याने मुंबई महानगरपालिकेने २८ नोव्हेंबरपासून नियमपालन न केलेल्या दुकानांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नियमपालन न केलेल्या दुकानांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमातील ततुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. कारवाईच्या पहिल्याच दिवशी पालिका प्रशासनाने एकूण ३२६९ दुकाने व आस्थापनांची तपासणी करून १७६ दुकानांवर कारवाई केली. पालिकेच्या २४ विभागांमध्ये बुधवारी १३ डिसेंबर रोजी पालिकेने ३४३२ दुकानांची झाडाझडती घेतली. यावेळी ३२९९ दुकाने व आस्थापनांनी मराठी नामफलक लावल्याचे आढळून आले. तर, केवळ १३६ दुकाने व आस्थापनांनी नियमांची अंमलबजावणी केली नसल्याचे समोर आले.

आणखी वाचा-मुंबई : घनकचरा विभागाच्या उपायुक्तांची तडकाफडकी बदली

मुंबई महानगरपालिकेने कारवाईच्या पहिल्या दिवसापासून १३ डिसेंबरपर्यंत पालिकेच्या २४ विभागांमधील ३६ हजार ९५७ दुकाने व आस्थापनांची तपासणी केली. त्यापैकी ३५ हजार २१५ दुकानांनी मराठी नामफलक लावल्याचे समोर आले असून १७४२ दुकाने व आस्थापनांनी मराठी नामफलकाच्या नियमांची पायमल्ली केली आहे.

Story img Loader