राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही ‘नन ऑफ द अबाऊ’ (नोटा) म्हणजेच ‘यापैकी कोणीही नाही’ हा पर्याय मतदान यंत्रांवर उपलब्ध होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना नकाराधिकाराचा पर्याय मतदारांना उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती. त्यानुसार आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध केला जाईल, अशी माहिती राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी दिली. मतदान यंत्रांवर उमेदवारांच्या नावांनंतर सर्वात तळाला हा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुढील महिन्यात नगर आणि धुळे महानगरपालिका निवडणुकांच्या काळात हा पर्याय मतदारांना उपलब्ध होईल.
आणखी वाचा