मद्यधुंदावस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एका पोलिसासह दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारी नूरिया हवेलीवाला हिने कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेविरोधात दाखल केलेले अपील मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दाखल करून घेतले.
न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी नूरियाने शिक्षेविरोधात केलेले अपील दाखल करून घेत तिच्या जामीन अर्जावरील सुनावणी ३ डिसेंबर रोजी ठेवली आहे. व्यवसायाने सौंदर्यतज्ज्ञ असलेल्या नूरियाने तीन वर्षांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एका पोलिसासह दोघांना चिरडले होते. त्यात दोघांचाही मृत्यू झाला होता. गेल्या १ नोव्हेंबर रोजी कनिष्ठ न्यायालयाने नूरियाला दोषी ठरवत पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. तसेच तिचा जामीन रद्द करीत तिला अटक करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला नूरियाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.    

Story img Loader