मुंबई : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांना पराभवाची धुळ चारून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) संजय पाटील यांनी विजय मिळवला होता. विधानसभा निवडणुकीत या परिसरातील मतदारसंघांत काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र विक्रोळी आणि मानखुर्द – शिवाजी नगर वगळता इतर चारही मतदारसंघांमध्ये महायुतीचा वरचष्मा असल्याचे दिसून आले.

लोकसभेची २०१९ मध्ये झालेली निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्रितरित्या लढवली होती. यावेळी ईशान्य मुंबईतून विद्यामान खासदार किरीट सौमेय्या यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र किरीट सौमेय्या यांच्याविरोधात असलेल्या रागामुळे शिवसेनेने त्यांना उमेदवारी देण्यास कडाडून विरोध केला होता. त्यामुळे भाजपचे मुंबई महानगरपालिकेतील त्यावेळचे गटनेते मनोज कोटक यांच्या पदरात उमेदवारी पडली. मनोज कोटक यांना विजयी करण्यासाठी शिवसेनेने सर्व ताकद पणाला लावली होती. यावेळी मनोज कोटक ५ लाख १४ हजार ५९९ मतांनी विजयी झाले होते. त्यानंतरची विधानसभा निवडणूक शिवसेना व भाजपने एकत्रित लढवली. विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये मानखुर्द – शिवाजी नगर मतदारसंघ वगळता उर्वरित पाचही विधानसभा मतदारसंघावर युतीचा भगवा फडकला होता. मुलुंड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मिहिर कोटेचा ८७ हजार २५३ मतांनी विजयी झाले होते. भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश कोरगावकर ७१ हजार ९५५ मतांनी विजय झाले होते. त्यावेळी शिवसेनेने आमदार अशोक पाटील यांनी डावलून कोरगावकर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे अशोक पाटील काहीसे नाराज झाले होते. मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले होते. विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी ६२ हजार ७९४ मते मिळवत एक हाती विजय मिळवला होता. त्याचप्रमाणे घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून राम कदम यांनी ७० हजार २६३ मतांनी विजय मिळवत भाजपचा गड कायम राखला होता. घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपने विद्यमान आमदार प्रकाश मेहता यांना डावलून पराग शहा यांना उमेदवारी दिली. प्रकाश मेहता यांची नाराजी दूर करणे पक्षासमोर मोठे आव्हान होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांची नाराजी दूर केल्याने पराग शहा यांना घाटकोपर पूर्व हा भाजपचा बालेकिल्ला राखणे शक्य झाले होते. पराग शहा यांनी ७३ हजार ५४ मते मिळवित विजय संपादन केला होता.

The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
Mumbai zopu yojana loksatta news
घर मिळालेल्या झोपडीवासीयांच्या नावे पुन्हा पात्रता! घोटाळा उघड होऊन वर्षभरानंतरही कारवाई नाही
zopu yojana audit
मुंबई : थकित भाड्याची तक्रार आल्यास आता झोपु योजनेचे ॲाडिट!
Municipal corporation takes action against illegally construction debris in Borivali
बोरिवलीत अनधिकृतपणे राडारोडा टाकणाऱ्यांवर पालिकेची कारवाई
National Book Trust is expanding across India with offices opening in Pune cities
एनबीटीची वार्षिक उलाढाल प्रथमच ५०० कोटी रुपयांवर, आता देशभरात विस्तारीकरण

हेही वाचा – मुख्यमंत्रीपदावरून पेच; शिंदेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न? शपथविधीचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची शक्यता

२०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. युती तुटली, पक्ष फुटले, राजकीय समीकरणे बदलली. त्याचा परिणाम २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर होण्याची चिन्हे होती. त्यामुळेच प्रत्येक पक्षाने सावधगिरी बाळगली होती. भाजपने लोकसभा निवडणुकीत विद्यामान खासदारांना वगळून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्याऐवजी मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे उद्धव ठाकरे मविआत सामील झाल्याने त्यांनी या मतदारसंघावर दावा केला.

तिसऱ्यांदा विजय

मुलुंड, घाटकोपूर पूर्व व घाटकोपर पश्चिम या आपल्या बालेकिल्ल्यातून भाजपने विजय मिळवला. घाटकोपर पूर्व मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी भाजपचे विद्यामान आमदार पराग शहा यांना चांगली लढत दिली. मात्र त्याना यश मिळवता आले नाही. पराग शहा ८५ हजार १३२ मते मिळवून विजयी झाले. त्याचप्रमाणे घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या राम कदम यांना शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) संजय भालेराव यांनी चांगली लढत दिली. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये संजय भालेराव यांनी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर राम कदम यांनी मोठी आघाडी घेत बाजी मारली. राम कदम यांनी ७३ हजार १७१ मते मिळवून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला.

हेही वाचा – दक्षिण मध्य मुंबई धारावी, वडाळा वगळता इतर मतदारसंघांत विरोधी कौल

मराठी मतदारांची सहानुभूती

२००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून विजयी झालेले व शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश घेतलेले संजय पाटील यांना शिवसेनेने (उद्धव ठाकरे) उमेदवारी दिली. लोकसभा निवडणुकीमध्ये मिहिर कोटेचा व संजय पाटील यांच्यामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. मात्र ईशान्य मुंबईतील मराठीबहुल वस्ती असलेल्या विक्रोळी, भांडुप, घाटकोपर पश्चिम येथील मराठी मतदारांनी आणि मानखुर्द-शिवाजी नगर येथील मुस्लीम मतदारांनी पाटील यांना भरभरून मतदान केले. संजय पाटील ४ लाख ५० हजार ९३७ मते मिळवत विजयी झाले. फुटलेला शिवसेना पक्ष, मराठी मतदारांची सहानुभूती मुळे ईशान्य मुंबई मतदारसंघात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली.

Story img Loader