मुंबईच्या प्रभादेवी परिसरात शिवसैनिकांनी उत्तर भारतीय तरुणाला मारहाण केल्याचं समोर आलं आहे. रस्त्यावर दुकान लावण्याच्या वादातून शिवसैनिकांनी उत्तर भारतीय तरुणाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे.
बुधवारी दुपारी ही घटना घडली. प्रभादेवी भागात स्टॉल का लावला, यावरुन शाखाप्रमुख शैलेश माळी यांनी कार्यकर्त्यांच्या साहाय्यानं स्टॉलचालक तरुणाला मारहाण केली. विशाल पांडे असं मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही घटना उघडकीस आली. दिनेश पाटील, शैलेश माळी, आणि शेखर भगत अशी आरोपींची नावं असून त्यांची जामिनावर सुटका झाल्याची माहिती आहे.