लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. शुक्रवारी (८ नोव्हेंबर) नाशिकमध्ये राज्यात सर्वांत कमी १४.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात पुढील पाच दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून थंड वारे राज्यात येत आहेत. त्यामुळे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत किमान तापमानात घट झाली आहे. शुक्रवारी नाशिकमध्ये राज्यात सर्वांत कमी १४.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. नगरमध्ये १५.७, जळगावात १५.७, महाबळेश्वरमध्ये १५.२ आणि पुण्यात १६.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडील वाऱ्याचा प्रवाह पुढील पाच दिवस कायम राहण्याचा अंदाज असल्यामुळे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात पुढील पाच – सहा दिवस थंडी राहण्याचा अंदाज आहे.
आणखी वाचा-न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा
राज्याच्या अन्य भागात थंडी वाढली आहे. मराठवाड्यात १६.५ ते १८ अंश सेल्सिअस, विदर्भात १७.५ ते १९.५ अंश सेल्सिअस आणि किनारपट्टीवर १९.६ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमान होते. शुक्रवारी कुलाब्यात २५.२ तर सांताक्रुजमध्ये २२.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील आठवडाभर राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही. ढगाळ हवामान निर्माण होण्याची शक्यता नाही, त्यामुळे तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे.
आणखी वाचा-वाढत्या इन्फ्लूएन्झापासून बचावासाठी ‘एसएच २४’ लस घ्या! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश
कमाल तापमानातही घट
राज्यभरात किमान तापमानात घट झालेली आहे, तशीच कमाल तापमानातही घट झाली आहे. किनारपट्टीवर ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात ३० ते ३२ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात ३१ ते ३४ अंश सेल्सिअस आणि विदर्भात ३१ ते ३३ अंश सेल्सिअस दरम्यान कमाल तापमान होते. मुंबईत कमाल तापमानात फार घट झाली नसली तरीही हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.