मुंबई : विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) महायुतीने उत्तर मुंबईचा गड राखला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड (प.) या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात घवघवीत यश मिळवित महायुतीने महाविकास आघाडीला दणका दिला. तर महाविकास आघाडीला केवळ मालाड (प.) मतदारसंघातील विजयावर समाधान मानावे लागले.

लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मोदी लाट आणि केलेल्या कामाची पोचपावती याच्या जोरावर भाजपचे गोपाळ शेट्टी उत्तर मुंबई मतदारसंघात विजयी होऊन संसदेत पोहोचले होते. त्यावेळी उत्तर मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यामान खासदार संजय निरुपम यांचा पराभव झाला होता. लोकसभेची २०१९ मधील निवडणूक रंजक आणि रंगतदार बनली. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसकडून उत्तर मुंबईत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोपाळ शेट्टी यांनी त्यांना पराभवाची धुळ चारली. लोकसभेच्या २०२४ मधील निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी नाकारून ती पीयूष गोएल यांना देण्यात आली. त्यामुळे गोपाळ शेट्टी नाराज झाले होते. मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात भाजप नेत्यांना यश आले. तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसने भूषण पाटील यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघात आव्हान निर्माण केले. मात्र राजकारणातील दांडगा अनुभव आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज यामुळे पीयूष गोएल यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. लोकसभेपाठोपाठ आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत उत्तर मुंबईतील मतदारांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली. त्यामुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळाला. भाजपचे पाच उमेदवार ४५ हजार ते एक लाखाच्या मताधिक्याने विजयी झाले. तर, एका जागेवर सहा हजारांच्या मताधिक्याने महाविकासआघाडीचा उमेदवार जिंकला.

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट
jitendra awhad talk on Constitution, jitendra awhad on Amit Shah, Amit Shah, jitendra awhad latest news,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आमची पॅशन – जितेंद्र आव्हाड
Will BJP win in Delhi this year Is the election challenging for AAP
दिल्लीत यंदा भाजपची बाजी? ‘आप’साठी निवडणूक आव्हानात्मक का?

हेही वाचा – ईशान्य मुंबई : लोकसभेची पुनरावृत्ती करण्यात मविआला अपयश

उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला ओळखला जातो. दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली, चारकोप आणि मालाड प. या सहापैकी पाच मतदारसंघांत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) महायुतीला घवघवीत यश मिळाले. केवळ मालाड प. मतदारसंघात काँग्रेसचे अस्लम शेख विजयी झाले. विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत विजयी झालेले बोरिवली मतदारसंघातील आमदार, भाजप नेते सुनील राणे यांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्याऐवजी संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली.

बोरिवली मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांना एक लाख ३९ हजाराहून अधिक मते मिळाली. तर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) संजय भोसले यांना ३९,६९० मते मिळाली. तब्बल १ लाख २५७ मतांधिक्याने भोसले यांचा पराभव झाला. दहिसर मतदारसंघात भाजपच्या विद्यामान आमदार मनिषा चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, यांच्याविरोधात शिवसेनेने (उद्धव ठाकरे) माजी आमदार विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली. उभयतांमध्ये कडवी झुंज झाली.

शेलार यांची सरशी

मागाठाणे मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे) विरुद्ध शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यात लढत झाली. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उदेश पाटेकर यांच्यात लढत झाली. प्रकाश सुर्वे तब्बल एक लाखाहून अधिक मते मिळवून ५८,१६४ मताधिक्याने तिसऱ्यांदा विजयी झाले. उदेश पाटेकर यांना ४७ हजार मते मिळाली. मालाड पश्चिम मतदारसंघात महायुतीने मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू, माजी नगरसेवक विनोद शेलार यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरविले होते. तर महाविकास आघाडीने या मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांना उमेदवारी दिली होती. अस्लम शेख यांना ९८,२०२, तर, विनोद शेलार यांना ९१,९७५ मते मिळाली.

हेही वाचा – दक्षिण मध्य मुंबई धारावी, वडाळा वगळता इतर मतदारसंघांत विरोधी कौल

सलग तिसऱ्यांदा विजय

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच मनिषा चौधरी आघाडीवर होत्या. या मतदारसंघात एकूण १ लाख ६० हजार मतदारांनी मतदान केले. त्यापैकी ९८ हजार ५८७ मते मनिषा चौधरी यांना, तर ५४ हजार २५८ मते घोसाळकर यांना मिळाली. ४४ हजार ३२९ मताधिक्याने चौधरी सलग तिसऱ्यांदा जिंकल्या आणि घोसाळकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. कांदिवली पूर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार अतुल भातखळकर यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांना तब्बल सव्वालाख मते मिळाली आहेत. ८३ हजाराच्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला. त्यांनी कॉंग्रेसच्या कालू बुधेलिया यांचा पराभव केला. चारकोपमध्ये भाजपचे योगेश सागर यांनाही १ लाख २७ हजार मते मिळाली.

Story img Loader