मुंबई : पश्चिम उपनगराचा भाग असलेल्या वायव्य लोकसभा मतदारसंघात महायुती आणि आघाडीमध्ये चुरशीची लढाई झाली. खरेतर ही लढाई महायुती विरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे) अशीच होती. या लढाईत दोन्ही बाजूने बरोबरीचा सामना झाला. तीन मतदारसंघात शिवसेनेच्या दोन गटात लढत झाली. भाजपकडे असलेला वर्सोवा मतदारसंघ ठाकरे यांना आपल्याकडे आणण्यात यश आले. तर अंधेरी पूर्वची ठाकरे गटाकडची जागा मिळवण्यात भाजपला यश आले आहे. त्यामुळे अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व, वर्सोवा, गोरेगाव, दिंडोशी अशा सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन शिवसेनेला (उद्धव ठाकरे), तर तीन भाजप – शिवसेना (एकनाथ शिंदे) महायुतीला मिळाल्या.

पश्चिम उपनगरातील अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला. पण गेल्या दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार अमित साटम निवडून येत आहेत. यावेळी साटम हे तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. कॉंग्रेसने या मतदारसंघात पुन्हा एकदा अशोक जाधव यांनाच उमेदवारी दिली होती. जाधव आणि साटम यांच्यात अटीतटीची लढाई झाली. मात्र साटम यांनी तब्बल १९ हजार ५९९ मताधिक्क्याने जाधव यांचा पराभव केला. साटम यांना ८४ हजार ९८१, तर जाधव यांना ६५ हजार ३८२ मते मिळाली. कॉंग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला आता भाजपचा गड बनला आहे.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Image Of Atul Save
Atul Save : कॅबिनेट मंत्री अतुल सावेंविरोधात शिवसेना मैदानात, पालकमंत्रीपदास केला विरोध
Sanjay shirsat marathi news
मंत्री संजय शिरसाट यांचा रोख अब्दुल सत्तारांवर
Deputy Chief Minister Eknath Shinde on a tour of Dare village
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे दौऱ्यावर

हेही वाचा – उत्तर मुंबई : भाजपचा बालेकिल्ला अबाधित

अंधेरी पूर्व या मतदारसंघात शिवसेनेच्या दोन गटात लढाई होती. हा मतदारसंघ शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) बालेकिल्ला. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) रमेश लटके या विभागाचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या. तेव्हा भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली होती. यावेळच्या निवडणुकीत मात्र हा मतदारसंघ शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) वाट्याला गेल्यामुळे मुरजी पटेल यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश केला व निवडणूक धनुष्यबाणावर लढवली. त्यामुळे या मतदारसंघात धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढाई झाली. लटके यांना यावेळी सहानुभूतीचा लाभ झाला नाही व पटेल निवडून आले. पटेल यांना ९४ हजार ०१० मते, तर ऋतुजा लटके यांना ६८ हजार ५२४ मते मिळाली. पटेल यांचा २५ हजार ४८६ मताधिक्याने विजय झाला.

जोगेश्वरी पूर्व या मतदारसंघतील लढत यावेळी अत्यंत चुरशीची झाली. शिवसेनेच्या दोन गटात ही लढत झाली. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) अनंत (बाळा) नर यांचा या मतदारसंघातून अगदी थोड्याशा फरकाने विजय झाला. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) माजी आमदार रवींद्र वायकर यांनी शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश केल्यानंतर या मतदारसंघावर नक्की कोणाचे वर्चस्व आहे हे सिद्ध करणारीच ही निवडणूक होती. वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यामुळे वायकरांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर नर हे देखील वायकर यांचे शिष्य असल्यामुळे ही गुरुशिष्याची लढत होती. या लढतीत अखेर नर हे विजयी झाले. अनंत नर यांना ७७ हजार ०४४, तर मनीषा वायकर यांना ७५ हजार ५०३ मते मिळाली. नर यांचा अवघ्या एक हजार ५४१ मतांनी विजय झाला.

एकेकाळी शिवसेनेकडे असलेल्या गोरेगाव मतदारसंघावर भाजपने आपले वर्चस्व यंदाही राखले आहे. भाजपच्या उमेदवार विद्या ठाकूर यांनी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार समीर देसाई यांचा २३ हजार मतांनी पराभव केला. ठाकूर यांनी या मतदारसंघात तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती. तर समीर देसाई यांच्यासाठीही महाविकास आघाडीने येथील मराठी व अल्पसंख्यांक मते आपल्याकडे मिळवण्याचा प्रयत्न केला होता. येथे परिवर्तन होईल अशी चर्चा होती. या भागातील गुजराती, मारवाडी, राजस्थानी, उत्तर भारतीयांनी ठाकूर यांना पाठिंबा दिला. त्यामुळे त्या विजयी झाल्या.

हेही वाचा – ईशान्य मुंबई : लोकसभेची पुनरावृत्ती करण्यात मविआला अपयश


बंडखोरी

● दिंडोशी मतदारसंघातील लढतीत अखेर प्रभू यांचा विजय झाला. प्रभू यांना ७६ हजार ४३७, तर निरुपम यांना ७० हजार २५५ मते मिळाली आणि प्रभू ६ हजार १८२ मताधिक्याने विजयी झाले.

● वर्सोवा हा मतदारसंघ या निवडणुकीत सुरुवातीपासून चर्चेत होता. मुस्लिम समाजाची मोठी संख्या असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेने (उद्धव ठाकरे) अल्पसंख्याक समाजाचे हारून शेख यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्या पक्षातच मोठी नाराजी पसरली होती. तर हा मतदारसंघ कॉंग्रेसला हवा होता.

उद्धव ठाकरे यांच्या खेळीमुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी होती. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी या मतदारसंघात बंडखोरी केली होती.


मतदारांचा विरोध

दिंडोशी मतदारसंघातही शिवसेनेच्या दोन गटात लढत झाली. या मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. सुनील प्रभू हे ठाकरे गटाचे विधानसभेतील प्रतोद आहेत. त्यांच्या विजयामुळे या मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) वर्चस्व कायम राहिले आहे. शिवसेनेने (एकनाथ शिंदे) या मतदारसंघात संजय निरुपम यांना उमेदवारी दिली होती. निरुपम यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसमधून शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश केला होता. मात्र निरुपम रहिवासी नसल्यामुळे त्यांच्या नावाला मतदारांचा व भाजपचाही विरोध होता.

Story img Loader